व्हिडिओ
New Traffic Rules : सरकारचा वाहतूक नियमात मोठा बदल, तीन महिन्यांत ड्रायव्हिंग लायसन्स रद्द?
वाहतूक नियम बदल: तीन महिन्यात ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होण्याची शक्यता, जाणून घ्या नवीन नियम.
वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वाहतून चालवताना काही नियमांचे उलंघन केल्यास ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होऊ शकतो. त्यामुळे आता वाहनचालकांनी वाहन चालवताना काही नियम लक्षात ठेवणे गरजेचे असणार आहे.
जर एखाद्या वाहनचालकाने ई-चलान (ट्रॅफिक दंड) तीन महिन्यांत भरला नाही, तर त्याचे ड्रायव्हिंग लायन्स रद्द होऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीवर एका आर्थिक वर्षात सिग्नल तोडणे किंवा धोकादायक वाहन चालवण्यासाठी तीन चलान झाले असतील, तर त्याचे लायसेन्स किमान तीन महिन्यांसाठी जप्त केले जाऊ शकते.