Manohar Joshi Passed Away : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचा जीवन प्रवास

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे. मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे. मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात प्राणज्योत मालवली आहे. मनोहर जोशी ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत.

1995 साली ते युतीच्या सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. तब्येत खालावल्यामुळे त्यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com