Lokशाही मराठीच्या दणक्यानंतर म्हाडाला जाग, जुन्याच भिंतींना डागडुजीकरून नवीन दाखवण्याचा घाट
LOKशाही मराठीच्या दणक्यानंतर म्हाडाला जाग आली आहे. कंत्राटदाराकडून उरलेल्या भिंतींच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. भिंतींना सिमेंट भरण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. जुन्याच भिंतींची डागडुजी करुन नवीन दाखवण्याचा घाट घालण्यात आला आहे. मुंबईत म्हाडाचा भिंत घोटाळा लोकशाहीकडून उघडकीस आला आहे. मुलुंडच्या भवानी गल्ली जवळी अमर नगर खिंडीपाडा परिसरात हे काम सध्या सुरु केलं आहे.
मुंबईच्या अनेक भागांमध्ये असेच प्रकार सुरू आहेत. मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेला संरक्षक भिंतीच्या कामामधील गौडबंगाल लोकशाहीने उघडकीस आणला आहे. मुंबईच्या अंधेरी आणि विक्रोळी परिसरामध्ये अनेक ठिकाणी भिंतींचं काम केलं असल्यास सांगण्यात आलं होतं.
आज लोकशाहीची टीम मुंबईचा दहिसर इथल्या केतकीपाडा परिसरामध्ये पोहचली असता त्या परिसरात देखील अनेक भागांमध्ये संरक्षण भिंत बांधण्यात आल्या असल्याचं सांगण्यात आलं. आणि याच कामासाठी 15 कोटीहून अधिक रुपये खर्च देखील कारण्यात आले आहे. पण प्रत्येक्षात 15 कोटीहून अधिक खर्चाच्या भिंतीच बाधल्या नसल्याच्या आढळून आल्या. मग मात्र मागच्या 10 वर्षा पासून याच कामासाठी मुंबई म्हाडा झोपडपट्टी सुधार मंडळाकडून कोट्यवधी रुपये लाटण्यात आले कसे हा सवाल उपस्थित होत आहे.