व्हिडिओ
OBC Reservation : विविध मागण्यांसाठी ओबीसींचा महामोर्चा
जिल्हास्तरीय आरक्षण समर्थनार्थ ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे.
यवतमाळ : जिल्हास्तरीय आरक्षण समर्थनार्थ ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी 26 नोव्हेंबर रोजी आझाद मैदान येथून महामोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात नुकतीच बैठकही घेण्यात आली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये, अशी प्रमुख मागणी आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देवून त्यांचे ओबीसीकरण करण्यात येऊ नये, ओबीसींसाठी प्रत्येक तालुक्यात वसतीगृह सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर काठोळे यांनी केले आहे.