Maharashtra Chitrarath: प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाही

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाही. यंदा १५ राज्यांचे चित्ररथ निवडले गेले, मात्र महाराष्ट्राला स्थान नाही. दिल्ली दरबारी विशेष प्रयत्नांची गरज?
Published by :
Team Lokshahi

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या झोळीत मतांचे भरभरून दान टाकणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील संचलनात परवानगी मिळालेली नाही. २६ जानेवारी २०२५ रोजी राजपथ म्हणजेच कर्तव्यपथावरील प्रतिष्ठेच्या संचलनासाठी यंदा १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आले.

या यादीत महाराष्ट्राला तूर्तास स्थान मिळालेले नाही. त्यामुळे यंदाही राज्य सरकारला दिल्ली दरबारी 'विशेष प्रयत्न' करण्याची वेळ येणार का? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नेहमीच लक्षणीय करतो. मात्र अलीकडे यासाठीही राज्याला प्रयत्न करावे लागतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com