व्हिडिओ
Maharashtra Drugs Issue | ड्रग्जच्या विळख्यात महाराष्ट्र; LOKशाही मराठीची ड्रग्जविरोधात मोहीम
महाराष्ट्र ड्रग्जच्या विळख्यात; LOKशाही मराठीची ड्रग्जविरोधात मोहीम सुरू. ड्रग्ज माफियांचा पर्दाफाश करून समाजाला वाचवण्याचा प्रयत्न.
ड्रग्समुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत, हे आपण ऐकले असेल, पाहिलेही असेल. देशासह महाराष्ट्रातही ड्रग्सचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. ड्रग्स माफिया अनेक वर्षांपासून आपल्या जाळ्यात लोकांना ओढत आहे आणि त्यांना नशेच्या खोल दरीत ढकलत आहे. याचा परिणाम फक्त त्या व्यक्तीवर होत नाही, ज्याला ड्रग्सची लत लागली आहे, तर त्याच्या कुटुंबावरही होतो. अशा नशेखोरांची आणि त्यांच्या कुटुंबियांची काय परिस्थिती असते? हे आपण कधी विचार केले आहे का?
हे सगळं थांबवण्यासाठी आता LOKशाही मराठा पुढाकार घेत आहे. महाराष्ट्र आणि मुंबई ड्रग्सच्या जाळ्यात अधिक अडकू नये, यासाठी LOKशाही मराठाने एक मोठी मोहीम सुरू केली आहे. यामध्ये आम्ही ड्रग्स माफियांचा पर्दाफाश करणार आहोत, जेणेकरून आपल्या समाजाला या धोक्यापासून वाचवता येईल.