जीएसटी संकलनात सरकार मालामाल? महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक

आर्थिक घडामोडीत सुधारणा झाल्यामुळे जुलै महिन्यात जीएसटी संकलन 1 लाख 48 हजार 995 कोटी झाले...  जुलै 2017 पासून जीएसटी व्यवस्था लागू झाल्यानंतर ही दुसरी सर्वांत मोठी  मासिक वसुली आहे...

आर्थिक घडामोडीत सुधारणा झाल्यामुळे जुलै महिन्यात जीएसटी संकलन 1 लाख 48 हजार 995 कोटी झाले...  जुलै 2017 पासून जीएसटी व्यवस्था लागू झाल्यानंतर ही दुसरी सर्वांत मोठी  मासिक वसुली आहे... तज्ज्ञांनुसार, जीएसटी व्यवस्थेच्या चांगल्या पद्धतीसाठी केलेल्या उपाययोजनांचाही परिणाम जीएसटी संकलनावर दिसला आहे...

संपूर्ण देशामध्ये एकसमान वस्तू व सेवा कर प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय केंद्र व राज्यशासनांनी एकमताने घेतला. 1 जुलै 2017 पासून त्याची अंमलबजावणी सुरु झाली. पेट्रोल-डिझेल वगळता सर्वच जीएसटीच्या कक्षेत आणले आहे. नुकतेच पॅकींग धान्य, दाळी, ताक, दही, पनीर यांच्यांवरही जीएसटी लावण्यात आले. जीएसटीनंतर सरकारचे कर संकलनात सातत्याने वाढ होत चालली आहे.

महिना        वर्ष 2021         वर्ष 2022                         वृद्धी (%)

एप्रिल                      1,39,708      1,67,540 कोटी रुपये          19.9 

मे                          97,821          1,40,885 कोटी रुपये         44.0  

जून                       92,800           1,44,616 कोटी रुपये        55.8  

जुलै                       1,16,393          ,48,995 कोटी रुपये         28.0  

जीएसटी संकलनात महाराष्ट्राची आघाडी

महाराष्ट्र : 22 हजार 128 कोटी रुपये

कर्नाटक : 9 हजार 795 कोटी रुपये

गुजरात : 9 हजार 183 कोटी रुपये

तमिळनाडू : 8 हजार 449 कोटी रुपये

उत्तर प्रदेश : 7 हजार 74 कोटी रुपये

सर्वसामान्य महागाईने बेजार झाला आहे. महिलांचे किचनचे बजेट कोलमडले आहे. दुसरीकडे जीएसटीतून सरकार मालामाल होतयं...कराचे चांगले संकलन हे राष्ट्राच्या विकासासाठी सकारात्मक आहे. परंतु सरकारने महागाई कमी कशी करता येईल.  यावरही उपाययोजना करणे गरजेच्या आहेत...तसेच जीएसटीत सर्वच गोष्टी आणत असतांना पेट्रोल, डिझेल आणायला हवे...

Lokshahi
www.lokshahi.com