मोठी बातमी! महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला?

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळतील तर त्यापाठोपाठ काँग्रेसला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळतील.

महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना प्रत्येकी एक जागा सोडणार असल्याचे समजते. या दोन्ही जागा ठाकरे गटाच्या कोट्यातूनच दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com