व्हिडिओ
Mahayuti Meeting: मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुंबईत महायुतीची बैठक? कोणाला कोणतं मंत्रिपद?
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी मुंबईत महायुतीची महत्वपूर्ण बैठक. कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार यावर चर्चा.
महायुतीच्या नेत्यांची उद्या मुंबईत बैठक होण्याची शक्यता वर्तावली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दिल्लीतील बैठकीनंतर मुंबईत बैठक होण्याची शक्यता आहे. अमित शहा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या बैठकीत उपस्थित असणार आहेत.
मात्र दिल्लीतील बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित नसल्याची माहिती समोर आली होती. मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार आणि महायुतीत कोण होणार मंत्री याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
या तिन्ही पक्षातील नेत्यांना कोणत खात मिळणार आहे त्यांच्या खात्यांमध्ये कोणत्या नव्या खात्याची भर पडणार आहे का? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. त्यामुळे आता उद्याच्या महायुतीच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार आहे याकडे आता लक्ष लागलेलं आहे.