Nashik Crime: नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई; टेरर फंडिंग करण्याप्रकरणी उच्चशिक्षित व्यक्तीला अटक

नाशिक शहरात दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना टेरर फंडींग करण्याच्या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi

नाशिक शहरात दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना टेरर फंडींग करण्याच्या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून ATS ने अटक केली आहे. इसिस आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांना फंडींग आणि सहभाग असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे. हुजेफ अब्दुल अजीज शेख (वय ३०) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी उच्च शिक्षित असून आणि अनेक कंपन्या असल्याची माहिती आहे. शेखच्या साथीदारांच्या तपासासाठी कर्नाटक, बिहार, तेलंगणामध्ये ATS पथकं रवाना झाले आहेत. आरोपीच्या घर झडतीत 7 मोबाईल फोन्स, लॅपटॉप आणि तीन जुने सिमकार्ड हस्तगत करण्यात आले आहे. संशयित शेख इसिसशी संबंधित महिलेला पैसे पाठवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष ATS न्यायालयाने आरोपी शेखला 31 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे. नाशिक शहरात प्रथमच अशी घटना घडल्याची माहिती आहे. राबिया उर्फ उम ओसामा या पाकिस्तानी महिलेच्या सांगण्यावरून आरोपीने पैसे पाठवले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com