व्हिडिओ
Nashik Crime : नाशिकमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; 10 लाखांची खंडणी घेताना महिलेसह तिच्या मुलाला अटक
नाशिकमध्ये 10 लाखांची खंडणी घेताना एका आईसह मुलाला पोलिसांनी अटक केली आहे
नाशिकमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. नाशिकमध्ये 10 लाखांची खंडणी घेताना एका आईसह मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. श्री स्वामी समर्थ आश्रमाच्या विश्वस्ताकडून ही खंडणी उकळण्यात येत होती. विशेष बाब म्हणजे विश्वस्ताने 1 कोटी 5 लाख रुपये अटक करण्यात आलेल्या महिलेला यापूर्वी दिल्याचे उघड झाले आहे.