Mahalaxmi Race Course: महालक्ष्मी रेसकोर्सवरील थीम पार्कचा मार्ग मोकळा

महालक्ष्मी रेसकोर्सवरील ‘थीम पार्क’चा मार्ग मोकळा झाला आहे. पुनर्विकास प्रस्ताव 540 मतांनी मंजूर करण्यात आला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

महालक्ष्मी रेसकोर्सवरील ‘थीम पार्क’चा मार्ग मोकळा झाला आहे. पुनर्विकास प्रस्ताव 540 मतांनी मंजूर करण्यात आला आहे. वादात अडकलेला महालक्ष्मी रेसकोर्सवरील थीम पार्क प्रस्ताव व्यवस्थापनाने मंजूर केला आहे. प्रस्तावाच्या बाजूने 540 सदस्यांनी मतदान केले आहे. तर विरोधात 168 सदस्यांनी मतदान केले. यामुळे रेसकोर्सच्या भाडेकराराचे नूतनीकरण करून 226 पैकी 120 एकर जागेवर महापालिकेतर्फे संकल्पना उद्यान (थीम पार्क) उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासूम चाललेल्या ई-मतदान प्रक्रियेत प्रक्रियेत 1800 सदस्यांपैकी केवळ 708 सदस्यांनी भाग घेतला. प्रस्ताव 540 मतांनी मंजूर झाला आहे. आदित्य ठाकरेंनी या प्रस्तावावरून राज्य सरकार आणि बीएमसीवर टीका केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com