त्याने मृत प्रेयसीशी बांधली लग्नगाठ, अंत्यसंस्कार करून शपथ घेत म्हणाला...
Admin

त्याने मृत प्रेयसीशी बांधली लग्नगाठ, अंत्यसंस्कार करून शपथ घेत म्हणाला...

दिल्लीमध्ये झालेल्या श्रद्धा हत्याकांडानंतर देश हादरुन गेला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे.

दिल्लीमध्ये झालेल्या श्रद्धा हत्याकांडानंतर देश हादरुन गेला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे. या प्रकरणावर सगळीकडून प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आसाम मधील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

हा व्हिडिओ आसामच्या गुवाहाटी येथील खाजगी रुग्णालयातील असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा आजाराने मृत्यू झाला. त्यावेळी तिचा बॉयफ्रेंड तिच्यासोबत त्या हॉस्पिटलमध्ये होता. हा २७ वर्षीय बिटुपन तामुली त्याने आपल्या मृत गर्लफ्रेंडच्या कपाळावर कुंकू लावून तिच्याशी लग्न केलं आहे. इतकंच नव्हे तर यापुढे मी कुणाशीही लग्न करणार नाही अशी शपथ त्याने घेतली आहे. असे प्रेम पाहून अनेकांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com