व्हिडिओ
Dhananjay Munde | Beed | धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे पाटलांचं टीकास्त्र, काय म्हणाले जरांगे पाटील?
धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे पाटलांचं टीकास्त्र; बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी बीड सत्र न्यायालयाने वाल्किम कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी बीड सत्र न्यायालयाने वाल्किम कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली असून 22 जानेवारीपर्यंत पीसीआर देण्यात आली आहे. यानंतर मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत जरांगे यांनी धनंजय मुंडेंची टोळी दंगली घडवणारी आहे अशी टीका केली. तसच बीडमधील कायदा-सुव्यवस्था बिघडू देऊ नका अस आवाहन देखील त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केलं आहे.