व्हिडिओ
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली | घरीच उपचार सुरु
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली असून अंतरवाली सराटीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जरांगे यांना ताप, जनरल इन्फेक्शन आणि अशक्तपणा जाणवत आहे.
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडलीये. अंतरवाली सराटीतच मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत. मनोज जारंगे पाटील यांची तब्येत बिघडल्याने त्यांना सलाईन लावण्यात आलीय. मनोज जरांगे यांना काल रात्रीपासून ताप आलेला आहे. जरांगे यांना ताप, जनरल इन्फेक्शन आणि थोडा अशक्तपणा जाणवत असल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिलीय. जरांगे यांना सलाईन लावण्यात आली असून त्यांचं रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आलं असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.