Manoj jarange On Chhagan Bhujbal: भुजबळांना मंत्रिपदापासून डावळल्यावर मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य

मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य: छगन भुजबळांना मंत्रिपदापासून डावळल्यावर काय म्हणाले मनोज जरांगे? जाणून घ्या सविस्तर.
Published by :
Team Lokshahi

आमदारांकडून मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही मोठ्या आमदारांना डावळण्यात आलं त्यात छगन भुजबळांचा देखील समावेश होता, आणि याचपार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांच्या मंत्रिपदावरून प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळांच्या मंत्रिपदाचं देण-घेण नाही... मंत्रिपदापासून भुजबळांना का डावळल हे ठावूक नाही? असं जरांगे म्हणाले आहेत.

तर पुढे जरांगे म्हणाले की, त्यांचा हा राजकीय प्रश्न आहे, त्यामुळे त्याबद्दलच आपल्याला काही माहित नाही... मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यासोबत आम्हाला काही देण-घेण नाही... गोरगरीबांच्या ओबीसींना देखील त्यांनी कधी काही खाऊ दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्यात मला पडायचं नाही. तो आरक्षणाचा विषय नाही तो त्यांचा राजकीय विषय आहे त्यामुळे ते त्यांच त्यांच बघून घेतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com