Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं पुण्यात जंगी स्वागत, लाखो मराठा बांधव रस्त्यावर

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मोर्चा पुण्यात दाखल झाला आहे. यामुळे पुण्यातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते.

पुणे : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जरांगे पाटील आंदोलन करीत आहेत. सरकारला दोन वेळा मुदत देऊनही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आता मुंबईत उपोषण करण्यासाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 20 जानेवारीला हजारो मराठा समाजबांधव अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मोर्चा पुण्यात दाखल झाला आहे. यामुळे पुण्यातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. यावेळी एक मराठा लाख मराठा या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com