Manoj Jarange Patil : पुन्हा उपोषण करणार, रायगडावरुन मोठी घोषणा; तारीखही ठरली

मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

रायगड : येथे मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केले आहे. 15 दिवसांत अधिवेशन घ्या, अध्यादेशाची अंमलबजावणी करा, अशी मागणी जरांगेंनी केली आहे. समिती मुदत वाढ देऊनही काम करत नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे. आंदोलन थांबवलं नाही, थांबवणार नाही. सरकारला 15 दिवसांचा वेळ दिला आहे. 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगेंनी जाहीर केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com