Manoj Jarange : गर्वाला कधी वाढ नसते, गर्व एक दिवस संपतो; जरांगेंची सरकारवर टीका

मराठा आरक्षणावरून जरांगेंनी सरकारवर टीका केलेली आहे. राज्यसरकारला गर्व असल्याचा जरांगेंनी आरोप केलेला आहे. तर सरकारला मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व आहे असं जरांगेंनी म्हटलेलं आहे.
Published by :
Team Lokshahi

मराठा आरक्षणावरून जरांगेंनी सरकारवर टीका केलेली आहे. राज्यसरकारला गर्व असल्याचा जरांगेंनी आरोप केलेला आहे. तर सरकारला मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व आहे असं जरांगेंनी म्हटलेलं आहे. गर्वाला कधी वाढ नसते, गर्व एक दिवस संपतो असा हल्लाबोल जरांगे पाटलांनी सरकारवर केलेला आहे.

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत, उपोषण करत आहेत आणि या पार्श्वभुमीवर त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केलेली आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून जरांगे पाटलांवर टीका होत असताना दुसरीकडे जरांगे पाटील ही टीका करत असताना दिसत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com