Manoj Jarange: अंतरवालीत विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग ; जरांगे घेणार इच्छुकांच्या मुलाखती

अंतरवाली सराटीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीला वेग आलेला आहे मनोज जरांगे पाटील आजपासूनच इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

अंतरवाली सराटीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीला वेग आलेला आहे मनोज जरांगे पाटील आजपासूनच इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत, तर या मुलाखती 20 ऑगस्टपर्यंत ते घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर येणाऱ्या विधानसभेमध्ये मराठा उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी जरांगे पाटलांनी चालवलेली आहे आणि त्याचपार्श्वभूमीवर इच्छुक उमेद्वारांच्या मुलाखती जरांगे पाटील घेणार आहेत.

तर आता कशा प्रकारे या मुलाखती घेतल्या जाणार आहेत या कडे आता लक्ष लागलेलं आहे, तसेच कोणाला उमेदवारी दिली जाणार आहे असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे. दरम्यान राज्यामध्ये किती उमेदवार मराठा आंदोलकांपैकी असतील याविषयी उत्सुकता लागलेली आहे. तसेच उमेदवारांकडून मतदारसंघनिहाय डेटा स्विकारला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com