Chhagan Bhujbal On Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीमध्ये स्थान नाही, भुजबळांचे विधान

मी तर पहिल्यापासून म्हणतोय, आता महाराष्ट्रमध्ये मराठा समाज संपणार, कारण प्रत्येकजण कुणबीच होणार. त्यामुळे आता एक मराठा लाख मराठा बोलण्यात काही अर्थच नाही.
Published by :
Team Lokshahi

मी तर पहिल्यापासून म्हणतोय, आता महाराष्ट्रमध्ये मराठा समाज संपणार, कारण प्रत्येकजण कुणबीच होणार. त्यामुळे आता एक मराठा लाख मराठा बोलण्यात काही अर्थच नाही. आता एक कुणबी लाख कुणबी बोलत चला आणि दुसरं म्हणजे त्यांनी स्वतः घोशणेतून कबूल केलयं की आम्ही मराठा आहोत आणि मराठा या समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण नाही हे 4 आयोग आणि 2 वेळा सुप्रीम कोर्ट यांनी स्पष्ट सांगितले आहे. अजुनही ते बोलताना एक मराठा लाख मराठा हेच बोलतात. म्हणजे तुम्ही मराठा आहात हे जर ते स्वतः सांगतायत आणि पुन्हा त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे. जर दबाव आणून आरक्षण घेतलं तर कोर्टाने त्या आरक्षणावर कारवाई किंवा बदल केला पाहीजे. माझा इतकंच म्हणणं आहे की मराठ्यांना वेगळ आरक्षण द्या, ओबीसीमध्ये घेऊन कोणालाच काहीच भेटणार नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com