व्हिडिओ
Manoj Jarange : अंतरवाली सराटीमध्ये आज मराठा समाजाची महत्वाची बैठक
मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून उपोषणाचा तिढा अखेर सुटला आहे. यानंतर आता अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची महत्वाची बैठक होणार आहे.
जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून उपोषणाचा तिढा अखेर सुटला आहे. सुधारित अध्यादेश सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. यानंतर आता अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची महत्वाची बैठक होणार आहे. आज दुपारी 12 वाजता ही बैठक होणार असून यात विजयी सभेची तारीख ठरण्याची शक्यता आहे.