व्हिडिओ
Pune : भुजबळांच्या 'या' वक्तव्यावरुन सकल मराठा समाज आक्रमक
दौंड तालुक्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड मधील एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जी टीका केली होती त्या टिकेनंतर पुणे जिल्ह्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. दौंड तालुक्यातील कुसेगावमध्ये सकल मराठा समाज आक्रमक होऊन समाजाच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे दौंडमधील वातावरण चांगलेच तापले आहे.