व्हिडिओ
Kolhapur : अजित पवारांसमोर प्रचंड राडा, मराठा आरक्षण बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ
कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ झाला आहे.
कोल्हापुर: कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ झाला आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक सुरू होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. योगेश केदार आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ केला. ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करत त्यांनी हा गोंधळ केला आहे. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाल्याची माहिती समोर येत आहे.