घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वादाची ठिणगी;उद्यानाला लावलेला गुजराती बोर्ड ठाकरे गटांन तोडला

घाटकोपर पूर्व येथील उद्यानाला लावण्यात आलेल्या 'मारु घाटकोपर' हे गुजराती मधलं नाव शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तोडून टाकलं आहे.
Published by :
shweta walge

घाटकोपर पूर्व येथील उद्यानाला लावण्यात आलेल्या 'मारु घाटकोपर' हे गुजराती मधलं नाव शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तोडून टाकलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हे गुजरातीमध्ये असलेलं नाव मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत होतं.

या अगोदर मनसेनं देखील हे नाव काढण्याची मागणी केली होती. मात्र मध्यरात्री शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अचानक या नावाची तोडफोड केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com