व्हिडिओ
Markadwadi तून जी ठिणगी पेटली ती देशात पोहोचवण्याचा Congress चा संकल्प - Nana Patole
मारकडवाडीतील मतदान आंदोलनाने राज्याचे लक्ष वेधले आहे. ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी केली, प्रशासनाने विरोध केला. कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
सोलापूरच्या माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडीतील मतदान आंदोलनाने राज्याचे लक्ष वेधले आहे. ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं ठरवलं होतं. पण प्रशासनाने याला विरोध केला. ग्रामस्थांनी निवडून आलेल्या उमेदवाराला त्यांच्या गावातून कमी मते कशी मिळाली यासाठी पुन्हा बॅलेट मतदान घ्यायंच ठरवलं होतं. आधीच विरोधकांनी यंदाच्या निकालाबाबत ईव्हीएमवर शंका उपस्थित केलीये. त्यामुळे या मारकडवाडीमधील बॅलेट पेपरवरील मतदानाकडे राज्याचे लक्ष लागलेले होते. परंतु प्रशासनाने याला विरोध केला होता. यावर कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.