व्हिडिओ
Palghar Fire : पालघरमध्ये यु.एस.फार्मा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भीषण आग
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील यु.एस.फार्मा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील खुपरी येथील यु.एस. फार्मा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भीषण आग लागली. ही आग दुपारी तीनच्या सुमारास लागली होती. आग विझवण्यासाठी वाडा नगरपंचायत अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली असून, आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सुदैवाने कंपनीत काम करणारे कामगार अडकले नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बोईसर तारापूर एमआयडीसी सह वाडा परिसरातील कारखान्यांमध्ये आगीच्या घटनेच्या संख्येत वाढ झाल्याने कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहे.