व्हिडिओ
Karuna Munde case : करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे संबंध लग्नासारखेचं, कोर्टाची टिप्पणी; मुंडेंना मोठा धक्का
माझगाव कोर्टाने करुणा शर्मा धनंजय मुंडे यांच्या संबंधांना लग्नासारखे मानले, मुंडेंना मोठा धक्का.
करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच होते असे निरीक्षण माझगाव कोर्टानं नोंदवलं आहे. त्यांनी 2 मुलांना जन्म दिला आहे. हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही. असं निरीक्षण माझगांव सत्र न्यायालयानं दिलं आहे.
धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना कोर्टानं तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत. करुणा मुंडेंना माझगाव कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे, माझगाव कोर्टाचा निकाल करुणा मुंडेंच्या बाजूने लागला असून याचा धनंजय मुंडे यांना मोठा धक्का लागला आहे.
युक्तिवादानंतर धनंजय मुंडेची याचिका फेटाळण्यात आली. तसेच करुणा मुंडे यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी दिलेलं आव्हानं शनिवारी फेटाळण्यात आले आहे.