मुंबईत वर्षअखेर मेट्रो-3 धावणार

मुंबईकरांच्या प्रतिक्षेतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 प्रकल्प डिसेंबर 2023 मध्ये सुरु होणार आहे. प्रकल्पासाठी 23 हजार कोटींची खर्च अपेक्षित होता.

मुंबईकरांच्या प्रतिक्षेतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 प्रकल्प डिसेंबर 2023 मध्ये सुरु होणार आहे. प्रकल्पासाठी 23 हजार कोटींची खर्च अपेक्षित होता. पण अडीच वर्षांत काम न झाल्याने हा खर्च आता 10 हजार कोटींनी वाढला आहे. या वाढीव खर्चाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मेट्रोच्या कामाला सुरूवात झाली होती, पण 2019 मध्ये महाराष्ट्रात सत्ता बदल्यानंतर आरेमधल्या कारशेडच्या कामाला ब्रेक लागला. तसेच भुयारी मेट्रोचा 33.5 कि.मी. इतका मोठा मार्ग देशात कुठेही नाही. दिल्लीमधील जमीन रेताड आणि मुंबईत हार्ड बेसाल्ट खडकांची आहे. दिल्ली भुयारी मेट्रो सहा डब्यांची आहे. मेट्रो-3 च्या गाड्या आठ डब्यांच्या आहेत. त्यामुळे दिल्ली मेट्रोपेक्षा जास्त मोठी जागा मेट्रो-3 ला लागणार आहे.

प्रकल्पाला का झाला उशीर?

2011मध्ये डीपीआर मंजूर झाला

केंद्राने 2013मध्ये मान्यता दिली

राज्य सरकारची 2014मध्ये मंजुरी

2016च्या पहिल्या तिमाहीत वर्क ऑर्डर

2011चा अंदाजित खर्च नंतर वाढला

2019मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात

गिरगाव, काळबादेवी व ग्रँट रोड स्थानके रखडली

26 अंडरग्राऊंड व 1 जमिनीवरचे स्थानकांचे काम

कफ परेड स्थानकात निर्बंध आल्याने दीड वर्षे उशीर

मेट्रो 3 मार्गिकेच्या कामाला 2016 मध्ये सुरूवात झाली. या भुयारी मेट्रो मार्गाचे काम करताना अनेक तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे प्रकल्पास विलंब झाला आणि २०२१ चा मुहूर्त चुकला. तसेच कारशेडचे काम रखडले व इतर तांत्रिक कारणामुळे खर्चात 10 हजार 270 कोटींची वाढ झाली आहे. आता प्रकल्प पूर्ण होईपर्यंत यात आणखी वाढ होण्याची शक्यताही आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com