Aditi Tatkare: "अपात्र महिलांना लाडक्या बहीण योजनेतून वगळणार" मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती
लाडकी बहिण योजनेबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. अशातच राज्य सरकार लाडक्या बहिणींना दिलेली रक्कम परत घेणार का? असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. अनेक अपात्र महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला. मात्र अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत तसेच शासनानं कुठलाही लाभ परत घेतला नाही, असं स्पष्टीकरण महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं होतं. असं असताना आता महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्वीट करत २८ जून आणि ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात अपात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात येणार अशी माहिती दिली आहे.
आदिती तटकरे यांच ट्वीट काय?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना !
दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून वगळण्यात येत आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला - २,३०,०००
वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला - १,१०,०००
कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला - १,६०,०००
एकुण अपात्र महिला - ५,००,०००
सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे !