MLA Disqualification Case: आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुनावणी; संपूर्ण राज्याचं लक्ष

शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील आमदार अपात्रता प्रकरणाची उद्या सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष असून फक्त महाराष्ट्राच नाही.

शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील आमदार अपात्रता प्रकरणाची उद्या सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष असून फक्त महाराष्ट्राच नाही, तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप झाले होते त्याचा निकाल उद्या लागणार आहे. ज्याप्रकारे आमदार फुटलेले होते त्यामध्ये आता कोणाची आमदार अपात्र होतात ते पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

दोन्ही शिवसेनेचे नेते तसेच दोन्ही राष्ट्रवादीचे नेते या निकालाकडे डोळे लावून बसलेले आहेत. कारण दोन अडीच वर्षांपूर्वी शिवसेना फुटलेली होती त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी फुटली होती आणि त्यामध्ये कोणत्या पक्षाचे नेते अपात्र होणार असा प्रश्न विचारला जात होता. विधानसभा अध्यक्षांनी याविषयी सुनावणी घेतली निकाल ही दिला मात्र तो निकाल या दोन्ही पक्षांना मान्य नाही आणि त्यानंतर न्यायालयामध्ये या पक्षांनी धाव घेतली. दरम्यान न्यायालयामध्ये उद्या याप्रकरणाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये आता काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com