पुण्यात मेडिकल महाविद्यालयात मनसेचा राडा

पुणे महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी मेडिकल रुग्णालयात मनसेने तोडफोड केली आहे.
Published by :
Team Lokshahi

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी मेडिकल रुग्णालयात डीनने लाच मागितल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर मनसेने महाविद्यालयातील केबिनची तोडफोड केली आहे.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील दहा लाख रुपये स्वीकारताना डीनला रंगेहाथ पकडण्यात आले होते म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने महाविद्यालयातील केबिनची तोडफोड करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात आशिष बानगीवार आणि त्यांच्या सोबत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या विद्यार्थी सेनेने केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com