MNS - MVA : नशिकमध्ये मनसे आणि मविआचा आगामी निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

(MNS - MVA ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता काही पक्षाकडून स्वबळाचा नारा देण्यात येत असतानाचा आज विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. मात्र नाशिकमध्ये वेगळे चित्र पाहायला मिळते आहे.

नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनले एकत्र आल्याचे बघायला मिळत आहे .आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज्यामध्ये अजूनही महायुतीसह महाविकास आघाडीचा फॉर्मुला ठरलेला नाही आहे. मात्र नाशिकमध्ये मात्र महाविकास आघाडीचा घटक पक्षाने एकत्र येण्याचा निर्धार केला आहे.

आगामी नगरपरिषद , नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेत्यांनी घेतला असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com