Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर; पद्धाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद
थोडक्यात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची पुण्यात बैठक
पुण्यातील पद्धाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे साधणार संवाद
(Raj Thackeray) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 2 डिसेंबरला यासाठी मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यातच राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असणार आहेत.
पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे संवाद साधणार आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची पुण्यात बैठक असणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून राज ठाकरे यांनी शहरातील सर्व शाखा अध्यक्ष यांची बैठक बोलवली आहे.
सकाळी 10 वाजता बैठकीला सुरुवात होणार असून संकल्प हॉल येथे ही बैठक असणार आहेत. राज ठाकरे या बैठकीमध्ये काय मार्गदर्शन करणार याकड सर्वांचे लक्ष लागले आहे.
