MNS Protest
MNS Protestteam lokshahi

MNS Protest Toll Rate : 'टोल वाढल्याने आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम '- अविनाश जाधव

टोल दरवाढ विरोधात मनसे आक्रमक झाले आहे. टोलच्या दरवाढी विरोधात मनसे ठाण्यात आमरण उपोषणाचा ईशारा दिला आहे.
Published by :
Team Lokshahi

टोल दरवाढ विरोधात मनसे आक्रमक झाले आहे. टोलच्या दरवाढी विरोधात मनसे ठाण्यात आमरण उपोषणाचा ईशारा दिला आहे. 1ऑक्टोबरपासून लागू झालेल्या टोल दरवाढी विरोधात मनसेच आंदोलन सुरू आहे. दरवाढ होण्याआधी आधी मनसेनं ईशारा दिला होता. त्यानंतर ठाणे शहरातील विविध चौकांत जनजागृती आणि निदर्शने केली. आता याचा पुढचा टप्पा म्हणजे उपोषण करण्यात येणार आहे.

ठाण्याच्या वेशीवर म्हणजे आनंदनगर चेक नाका येथे मनसेचे कार्यकर्ते उपोषणाला बसणार आहेत. मात्र ठाणे पोलिसानी त्यांना परवानगी नाकारली आहे. तरीही मनसे उपोषणावर ठाम असून काहीही झालं तरी उपोषण करणारच असा पवित्रा मनसेने घेतला आहे. त्यामुळे पोलीस आणि मनसैनिकांत वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com