Sanjay Raut: 'मोदींनी शिवरायांसह महाराष्ट्राचा अपमान केलाय' मोदींच्या जिरेटोपावरुन राऊतांचा हल्लाबोल

पंतप्रधान मोदींना प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप भेट दिलेला आहे. मोदींना जिरेटोप घातल्याबद्दल पटेलांविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पंतप्रधान मोदींना प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप भेट दिलेला आहे. मोदींना जिरेटोप घातल्याबद्दल पटेलांविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर मोदींनी शिवरायांसह महाराष्ट्राचा अपमान केल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. मोदींनीची पटेलांवर आरोप केले होते. इक्बाल मिर्ची आणि दाऊद इब्राहिम खुख्यात गुंड यांचा संबंध प्रफुल्ल पटेल यांच्याशी असलेला आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता आणि त्याच पंतप्रधान मोदींना प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप घातलेला आहे.

ज्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं त्या देशाच्या प्रधानमंत्र्यानी त्याच मिर्चीवाल्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना जो जिरेटोप असतो तो आपल्या डोक्यावर घालून घेतला आहे. हा शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच कारण मोदी रोज महाराष्ट्राचा अपमान करतायेत. मोदी रोज महाराष्ट्र तोडण्याचं स्वप्न पाहतायेत आणि ज्या दाऊदचा आरोप मोदींनी केला त्याच व्यक्तीकडून मोदी जिरेटोप घालून घेत आहेत. हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे आणि महाराष्ट्र अत्यंत गांभीऱ्याने पाहतंय असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com