Rahul Gandhi: 'अंबानी टेम्पोने पैसे देतात याचा मोदींना अनुभव' राहुल गांधींचं मोदींना प्रत्युत्तर

मोदींच्या टीकेवर राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Published by :
Sakshi Patil

अदानी-अंबानीवरुन राहुल गांधी गप्प का? असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधींनी किती पैसे घेतले, ट्रक भरून पैसे आले आहेत का? असा सवाल सुद्धा त्यांनी केला. त्यानंतर मोदींच्या या टीकेवर राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अंबानी टेम्पोने पैसे देतात यांचा वैयक्तिक अनुभव असल्याचं राहुल गांधी म्हणाले. अंबानी आणि अदानी यांच्याकडे ईडी पाठवा. मोदी सरकार हे उद्योगपतीधार्जिणं असल्याचा आरोप राहुल गांधी सातत्यानं करतात. मोदी त्यांच्या उद्योगपती मित्रांवर मेहरबान असल्याचा आरोपही राहुल गांधी करत असतात. पण आता हेच आरोप त्यांच्यावरच उलटल्याची स्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस उद्योगपतीधार्जिणे असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींनी अदानी आणि अंबानींकडून किती पैसे घेतले? हे जाहीर करावं असं राहुल गांधी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com