Monsoon Update : मान्सूनबाबत आनंदाची बातमी, राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता

महाराष्ट्र वासीयांनसाठी आनंदाची बातमी, राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
Published by :
Team Lokshahi

महाराष्ट्रामध्ये मान्सूनबाबत आनंदाची बातमी आहे. राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. चार ते सात जूनच्या दरम्यान मान्सून कोकणामध्ये येण्याचा मच्छिमार्यांचा अंदाज आहे. कोकणकिनारपट्टीवर मान्सूनची चाहुल देणाऱ्या बदलांना आता सुरुवात झालेली आहे.

समुद्राच्या लाटामधून किनारपट्टीवर मातीच्या रंगाचा फेस येण्यास आता सुरूवात झालेली आहे. मान्सून सक्रिय होण्याच्या आधीच काही दिवस हे बदल केवळ कोकणकिनार पट्टीवर जाणवताना दिसून येतात. राज्यात वेळेआधीच मान्सून कोकणकिनार पट्टीवर सूरू होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com