Rain Update: पुढील तीन दिवसांत पाऊस मुंबईसह विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात धडक देण्याचा अंदाज

राज्यात मोसमी पावसाचे आगमन, 3 दिवसात मुंबईसह विदर्भ, उ.महाराष्ट्रात पाऊस धडकणार, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

राज्यामध्ये मोसमी पावसाचे आगमन झालेले आहे. पुढील तीन दिवसात मुंबईसह विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पाऊस धडकणार असून शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणात एक दिवस आधीच मान्सून दाखल झालेला आहे.

6 जूनपासूनच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तळकोकणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या दोन ते तीन दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com