Monsoon News : केरळमध्ये 31 मे ला मान्सून दाखल होणार,हवामान विभागाचा अंदाज

मोसमी पाऊस 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मोसमी पाऊस 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.

सध्या उत्तर भारतात वाढलेले तापमान, दक्षिण भारतात सुरू असलेला जोरदार पूर्वमोसमी पाऊस, दक्षिण चीन समुद्रातील ढग आणि वाऱ्याची स्थिती, नैऋत्य आणि वायव्य हिंदी महासागरातील वाऱ्याची दिशा आणि वेग मोसमी पावसासाठी पोषक आहे. त्यामुळे नैऋत्य मोसमी पाऊस 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com