व्हिडिओ
ईडीच्या केसेस कधी रद्द होणार? शिवसेनेच्या आमदार-खासदारांचा मुख्यमंत्र्यांमागे तगादा
ईडीकडून दाखल झालेल्या केसेस कधी रद्द होणार, असा तगादा शिवसेनेच्या आमदार खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मागं लावल्याची माहिती समोर आली आहे.
ईडीकडून दाखल झालेल्या केसेस कधी रद्द होणार, असा तगादा शिवसेनेच्या आमदार खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) मागं लावल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेच्या अनेक खासदार आणि आमदारांवर ईडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या या गुन्ह्यांची चौकशी थांबली असली तरी ईडीचे गुन्हे कायम आहेत. त्यामुळं पुन्हा कधीही ईडीची चौकशी सुरु होण्याची भीती शिवसेनेच्या या नेत्यांच्या मनात आहे. त्यामुळं हे गुन्हे लवकरात लवकर रद्द करावेत किंवा प्रकरणं निकाली काढण्याची मागणी शिवसेनाच्या आमदार खासदारांकडून होत आहे.
