Nilesh Lanke : खासदार निलेश लंकेंची गुंडांशी जवळीक? गुंड गजानन मारणेकडून निलेश लंकेंचा सत्कार

पुण्यात कोथरूड भागातील गुंड गजानन उर्फ गज्या मारणेकडून खासदार निलेश लंकेंचा सत्कार करण्यात येत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पुण्यात कोथरूड भागातील गुंड गजानन उर्फ गज्या मारणेकडून खासदार निलेश लंकेंचा सत्कार करण्यात येत आहे. खासदारपदी निवड झाल्याबद्दल मारणेकडून लंकेंचा सत्कार करण्यात आलेला आहे. खासदार निलेश लंकेंची गुंडांशी जवळीक आहे काहा सवाल आता या निमित्ताने उपस्थित होत आहे. खासदार निलेश लंकेंचा हा सत्कार वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे.

घायवळ मूळचा नगर जिल्ह्यातील जामखेडमधील आहे. गेल्या काही वर्षांपासून घायवळने कर्जत, जामखेड परिसरात दबदबा निर्माण केला आहे. घायवळला शह देण्यासाठी मारणे खासदार निलेश लंकेंचा सत्कार करून वेगळी चाल खेळली, अशी चर्चा गुन्हेगारी वर्तुळात सुरू झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com