MPSC Update : एमपीएससी पूर्व परिक्षेची तारीख बदलली!

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 6 जुलैऐवजी 21 जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

एमपीएससी पूर्व परिक्षेची तारीख बदलली आहे. राज्य सरकारच्या विविध विभागातील 524 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 21 जुलै रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाकडून गुरुवारी करण्यात आली.

शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास, अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा उपलब्ध करून देण्याचा तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या (अराखीव करीता वयापेक्षा अधिक) उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय सदर शुद्धीपत्रकानुसार आयोगाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 6 जुलैऐवजी 21 जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com