Mumbai Best Bus Strike : बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सातवा दिवस; प्रवाशांची फरफट सुरुच

बेस्ट कंत्राटी कर्मचारी संपाचा आजचा सातवा दिवस आहे.
Published by :
Team Lokshahi

बेस्ट कंत्राटी कर्मचारी संपाचा आजचा सातवा दिवस आहे. बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आजही संप सुरूच आहे. 9000 बेस्ट कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपाचा मोठा फटाका बेस्टच्या प्रवाशांना बसत आहे. रात्री उशिरा बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली. काल मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही येत्या 24-48 तासात बेस्ट पूर्वपदावर येईल असं सांगितलं होतं. आज 11 वाजता पुन्हा बेस्टचे कंत्राटी कर्मचारी आझाद मैदानात एकत्र येत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com