Mumbai-Goa Highway : मनसे मुंबई गोवा महामार्गासाठी पदयात्रा काढणार

मनसे नेते अमित ठाकरे आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मनसे पदयात्रा काढणार आहे.
Published by :
Team Lokshahi

मनसे नेते अमित ठाकरे आता ‍अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मनसे पदयात्रा काढणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे विशेषतः रखडलेला मुंबई गोवा महामार्ग याविरोधात आवाज उठवला आहे.

23 ते 30 ऑगस्ट दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर मनसे अमित ठाकरेंच्या नेतृत्वात ही पदयात्रा काढणार असून मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. तीन टप्प्यात ही पदयात्रा असेल. पहिले दोन टप्पे चालत असतील. तिस-या टप्प्यात गाव जनजागृती अभियमान राबवलं जाईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com