धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; सातही धरणांमधील पाणीसाठा पोहोचला 18 टक्क्यांवर

मुंबईत काल जोरदार पाऊस पडला.

मुंबईत काल जोरदार पाऊस पडला. मुंबईतील मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. मात्र या जोरदार पावसामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कालच्या पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून सातही धरणांमधील पाणीसाठा पोहोचला 18 टक्क्यांवर पोहचला असल्याची माहिती मिळत आहे.

मुसळधार पावसामुळे एका दिवसात पाणीसाठ्यात तब्बल 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट दूर होण्यास मदत होणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com