मुंबई मेट्रोच्या कामाला गती, एमएमआरडीएला 272 कोटींचा निधी वितरीत

मेट्रोच्या कामाला गती मिळणार आहे. मेट्रो मार्गांसाठी 272 कोटी रुपये एमएमआरडीएला वितरीत करण्यात आला आहे.
Published by :
Team Lokshahi

मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीसांकडून मेट्रोच्या कामाला गती मिळाली आहे. राज्य सरकारकडून मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, मुंबई महानगरातील मेट्रोसह पुण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी एमएमआरडीएला भरघोस निधी वर्ग केला गेला आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरुपात सरकारला मिळाली रक्कम मिळाली आहे. मेट्रो मार्गांसाठी 272 कोटी रुपये एमएमआरडीएला वितरीत करण्यात आला आहे.

कुठल्या मेट्रोसाठी किती रक्कम?

  • मेट्रो-५ मार्गिकेसाठी (ठाणे-कल्याण-भिवंडी) राज्य शासनाकडून एमएमआरडीएला २३.८३ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत

  • मेट्रो मार्ग ९ (दहिसर ते मीरा भाईंदर) आणि मार्ग ७ अ (अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून एमएमआरडीएला २२ कोटी रुपये कर्ज वितरीत

  • मुंबई मेट्रो-७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून २७.५० कोटी रुपये एमएमआरडीएला कर्ज वितरीत

  • मुंबई मेट्रो-४ (कासारवडवली) आणि मेट्रो ४अ (कासारवडवली ते गायमुख) प्रकल्पासाठी राज्य सरकारचे ५६.८३ कोटी रुपये एमएमआरडीएला वितरीत

  • मुंबई मेट्रो २बी (डीएन नगर ते मंडाळे) प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून ५३.९० कोटी रुपये एमएमआरडीएला वितरीत

  • मुंबई मेट्रो २अ (दहिसर पूर्व ते डीएन नगर) प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून २७.५० कोटी रुपये एमएमआरडीएला वितरीत

  • मेट्रो लाईन ६ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) प्रकल्पासाठी ३६.६७ कोटी रुपये एमएमआरडीएला राज्य सरकारकडून वितरीत

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com