Mumbai : केईएमच्या मेडिकल रिपोर्टच्या पेपरप्लेट; रुग्णांचे रिपोर्ट रद्दीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार

केईएम रुग्णालयात मेडिकल रिपोर्टच्या पेपरप्लेट, रुग्णांचे रिपोर्ट हे रद्दीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Published by :
Team Lokshahi

केईएम रुग्णालयात मेडिकल रिपोर्टच्या पेपरप्लेट, रुग्णांचे रिपोर्ट हे रद्दीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर रद्दीच्या पैशांचा हव्यास येथे पाहायला मिळत आहे. केईएम रुग्णालयात रुग्णांचे रिपोर्ट रद्दीत टाकले गेले आहेत आणि त्यापासून पेपरप्लेट तयार करण्यात आल्या आहेत.

यावर संदीप देशपांडे यांनी ट्विट करत रुग्णांचे रिपोर्ट रद्दीमध्ये विकणाऱ्या अधिकाऱ्यांवर मुंबई महानगरपालिका काय कारवाई करणार असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी केली आहे. तर किशोरी पेडणेकर देखील या प्रकरणासंदर्भात रस्त्यावर उतरल्या आहेत. या पेपरप्लेटचा व्हिडियो किशोरी पेडणेकर यांनी ट्विट करून समोर आणलेला होता. मात्र यावर आता संताप व्यक्त केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com