Mumbai Pollution News | मुंबईतील हवेची गुणवत्ता 'अधिक गंभीर'; काय म्हणाले Dr. Tushar Palve पाहा...

मुंबईतील हवेची गुणवत्ता 'अधिक गंभीर'; वाढलेल्या आर्द्रतेमुळे धूर आणि धूळ साचल्याने एअर क्वालिटी इंडेक्स 200 ते 300 च्या दरम्यान, बोरिवली-मालाडमध्ये एक्यूआय 308 नोंदवला.
Published by :
shweta walge

मुंबईत थंडीचा कडाका वाढत असताना वाढलेल्या आर्द्रतेमुळे हवेत धूळ आणि धूर साचण्याचं प्रमाण वाढल्याचं समोर आले आहे. बहुतांशी ठिकाणी विषारी धुरक्याची चादर पसरल्याने दुश्यमानता कमी झालेली आढळून आली. यातच सरासरी एअर क्वालिटी इंडेक्स 200 ते 300 च्या दरम्यान नोंदवला गेल्याने ‘खराब’ हवेची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नेव्हीनगर कुलाबा, वरळी, माझगाव, शिवडी, बोरिवली आणि मालाडमधील हवेची गुणवत्ता प्रचंड खालावल्याचे समोर आले आहे. शनिवारी तर बोरिवली आणि मालाड पश्चिमच्या हवेचा एक्यूआय 308 इतका नोंदवला गेला. रविवारीदेखील मुंबईत अनेक भागात हवेची गुणवत्ता खालावल्याचे आणि धुरक्यामुळे दृश्यमानता कमी झाली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com