Mumbai University Senate Election : सिनेट निवडणुकीसाठी आज मतदान, कोण मारणार बाजी?

सिनेट निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.

सिनेट निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. युवासेना आणि अभाविप मध्ये थेट लढत होताना पाहायला मिळत असून मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता मतदान पार पडणार आहे.

अभाविप आणि युवासेना यांच्याबरोबरच बहुजन विकास आघाडी आणि छात्रभारती याही संघटना रिंगणात उतरल्या आहेत. युवासेनेकडून खुल्या वर्गातून 5, तर इतर प्रवर्गातून 5 असे एकूण 10 उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहेत.

2018च्या निवडणुकीत युवासेनेने बाजी मारून 10 सदस्य निवडून आणले होते. 10 जागांवरील निवडणुकीसाठी एकूण 28उमेदवार असून या निवडणूकीसाठी एकूण 13,406 मतदार आहेत.

मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण 38 मतदान केंद्रावर आणि 64 बुथवर ही निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे आता या सिनेट निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com